Header Ads

संखमधिल गुरूबसव विद्यामंदिरमध्ये आज 'करिअर नव्या वाटा व दिशा' सेमीनार


संख : संख ता.जत येथील श्री. गुरूबसव विद्यामंदिर अँड ज्यू कॉलेज आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये स्पर्धा परिक्षा केंद्राकडून 'करिअर नव्या वाटा व दिशा' या एकदिवसीय मोफत ऑफलाईन सेमिनारचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे समन्वयक अजय पाटील यांनी दिली.या सेमिनारसाठी भारतीय संविधान आणि राजकारण या विषयाचे प्रसिद्ध लेखक सुभाष पवार या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
आज सोमवार ता.८ ऑगष्ट रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या हॉलमध्ये या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.या सेमिनारच्या अध्यक्षपदी डॉ.आर.के.पाटील व मुख्याध्यापिका सौ.कविता पाटील उपस्थित असणार आहेत. या सेमिनारचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.