Header Ads

शेगाव येथे महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न


शेगांव,संकेत टाइम्स : सृजनाचा अनोखा अविष्कार असलेला श्रावण महिना शेत शिवार आला चिंब करणारा झाडा फुलांना बहरून टाकणारा पशुपक्ष्यांना सुखावणारा मना मनांना उल्हासित करणारा आणि चराचराला नवरूप देणारा श्रावण जीवनाचा आनंद यात्रेतला हा उत्सवच त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रूढी-परंपरांना थोडा थाटात दिलेला आहे.गेले दहा वर्ष झाले शेगाव मध्ये नागपंचमीला शुकशुकाटच असतो ना गाण्यांचा सूर कानावर येतो ना स्त्रियांची लगबग म्हणून थोडा रूढी-परंपरांना परत जीवदान द्यावे वाटले यातूनच महासंग्राम पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला.


आयडियल महिला ग्रुप शेगाव व बचत गट यांच्या अध्यक्ष संगीता साळे तसेच चिंच विसावा ऍग्रो टुरिझम सेंटर चे मालक दाम्पत्य सिंपल हात बोराडे व सौ उज्वला बोराडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला.दहा वर्षानंतर पहिल्यांदाच शेगाव मध्ये झिम्मा फुगड्या खेळ रंगला होम मिनिस्टर चा धरतीवरती तब्बल सहा राऊंड असलेला हा कार्यक्रम हसत-खेळत पार पडला. कार्यक्रमासाठी सौ भारती पट्टणशेट्टी,सौ सुवर्णा शिंदेे, सौ सारिका खिलारे, सौ सुकन्या स्वामी, कविता काटे, अश्विनी बुरुटे यांनी परिश्रम घेतले.अँकरिंग श्रीमती संगीता शिरसाळे व प्रल्हाद बोराडे यांनी केले तर परीक्षक व गुण लेखक म्हणून सुवर्णा सर्वदे, मोनिका सर्वदे जवळे यांनी काम पाहिले. साडेतीनशे पेक्षा जास्त महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. 


जत तालुक्यातील हा पहिलाच असा मोठा आणि उत्कृष्ट कार्यक्रम असावा अशी प्रतिक्रिया शेगाव येथील सुप्रसिद्ध लेख श्री महादेव बोरुडे यांनी दिली शेगाव पंचक्रोशीतील महिलासुद्धा स्पर्धक म्हणून उपस्थित होत्या पैठणीच्या दावेदार एकूण साठ महिलांपैकी सौ कांता कोडक या पैठणी च्या दावेदार ठरल्या अनेक महिलांनी ग्रामस्थांनी कार्यक्रम खूपच छान झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्याा. द्वितीय पारितोषिक पटकावणाऱ्या श्रीमती अस्मिता श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रम पाहून माझं आजारपणात पळून गेलं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.तृतीय क्रमांक पिंकू तानाजी शिंदे यांनी पटकावला.

Blogger द्वारे प्रायोजित.