Header Ads

आर.आर.आबा यांच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न


कवठेमहांकाळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा)पाटील यांच्या ६४ व्या जयंती निमित्त गुरुवारी दिनांक २५ ऑगस्ट रोजी लोकशाहीर राजा पाटील नाट्यगृह,कवठे महांकाळ येथे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील तसेच युवानेते रोहीतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.


            या स्पर्धेचे उद्घाटन कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगर पंचायतीच्या आरोग्य सभापती मीराबाई वनखेडे,गटनेत्या नलिनी भोसले,नगरसेविका अनिता खाडे व जयश्री लाटवडे,राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा सुरेखा कोळेकर,तालुका उपाध्यक्षा पवित्रा खोत,तालुका कार्याध्यक्षा नूतन वाघमारे,तालुका युवती अध्यक्षा साईश्वरी जाधव,शहर अध्यक्षा मीनाक्षी माने,शहर संघटक सुवर्ण कवठेकर,शहर कार्याध्यक्षा प्राजक्ता बोगार,जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबूताई वाघमारे व दीपा जाधव तसेच जिल्हा चिटणीस छाया शेजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

                  या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,विशाल माळी,सद्दाम पठाण,शीतल कुंभार,अनिकेत कोष्टी,अजित सुतार आणि संजय कोठावळे यांनी केले होते.या स्पर्धेसाठी नगर पंचायत,कवठे महांकाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रवेश फी स्पर्धकांना शंभर रुपये ठेवण्यात आली होती.या रांगोळी स्पर्धेसाठी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गेंड यांच्या वतीने देण्यात येणारे सात हजार रुपयाचे पहिले बक्षीस अभिजित सूर्यवंशी आणि सचिन अवसरे यांच्यात विभागून देण्यात आले.युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष महेश पाटील यांच्या वतीने देण्यात येणारे द्वितीय क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे बक्षीस अश्विनी पोतदार आणि नम्रता माने यांच्यात विभागून देण्यात आले.

                 कवठे महांकाळ नगर पंचायतीचे बांधकाम सभापती संजय वाघमारे यांच्या वतीने देण्यात येणारे तृतीय क्रमांकाचे बक्षीस विठ्ठल पाटील आणि साक्षी घाळे यांच्यात विभागून देण्यात आले.नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांच्याकडून देण्यात येणारे रक्कम रुपये दोन हजारचे चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस सरताज मुलाणी आणि मनिषा माळी यांच्यात विभागून देण्यात आले.दत्तात्रय बेंडे यांच्या वतीने देण्यात येणारे पाचव्या क्रमांकाचे रक्कम रुपये एक हजाराचे बक्षीस रामभाऊ जाधव यांना मिळाले.या रांगोळी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून तसेच तालुक्यातील विविध गावातून स्पर्धक आले होते.या रांगोळी स्पर्धेसाठी स्थानिक महिला वर्ग,विद्यार्थिनी तसेच तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात भाग घेतला.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.