Header Ads

सांगोला नगरपालिके तर्फे फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक*


सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे कौतुक सांगोला नगरपालिकेतर्फे करण्यात आले. भारत देशाच्या ७५  व्या अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण  देशात विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या 'हर घर  तिरंगा' अभियानांतर्गत फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली व पथनाट्य सांगोला शहरात सादर केले. 


रॅलीमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून देशाभिमान,राष्ट्रप्रेम जागृत व्हावे ही भावना प्रशालेचे प्राचार्य सिकंदर पाटील यांची होती.फबटेक  प्रशालेचे संगीत शिक्षक डॉ. अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर झाले. या पथनाट्याची नोंद घेऊन सांगोला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री कैलास केंद्रे यांनी फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक केले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य  श्री सिकंदर पाटील व पर्यवेक्षक सौ.वनिता बाबर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Blogger द्वारे प्रायोजित.