Header Ads

जत तालुक्यातील जि.प. शाळांच्या धोकादायक खोल्यासाठी निधी द्यावा : प्रकाश जमदाडे यांची शिक्षणमंञ्याकडे मागणी | रिक्त पदेही भरण्याची मागणी


जत : जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील २७६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत,तर ६५ वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत आहे.या खोल्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध द्यावा तसेच रिक्त पदे तातडीने भरावीत,अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक तथा जतचे नेते प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.तसे निवेदन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि,जत तालुक्यात मराठी उर्दू व कन्नड या माध्यमाचे ४३६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. या शाळेतील २७६ इतकी रिक्त पदे आहेत. या रिक्त पदाचा अतिरिक्त भार,इतर शिक्षकांवर असल्याने अध्ययन व अध्यापन करत असताना अडचणी येत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर देखील मोठा परिणाम होत आहे. या रिक्त पदामुळे द्विशिक्षिका शाळा एक शिक्षकी बनल्या आहेत. अनेक शाळेतील चार वर्गास एकाच शिक्षकाला अध्यापन करावे लागत आहे. दरम्यान असाच प्रकार कागनरी (ता.जत) या कर्नाटक सीमावर्ती भागात जिल्हा परिषद कन्नड शाळेत १२० विद्यार्थी पहिली ते सातवी या वर्गात अध्ययन करत आहेत परंतु दिनांक १ ते ४ जुलै अखेर या ठिकाणी सात वर्गासाठी एकच शिक्षक शिकवत होते. 

तरी भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असणाऱ्या तालुक्यात रिक्त पदाचा अनुशेष दूर करण्याची नितांत गरज आहे असे वाटते. याबाबत आपण योग्य त्या सूचना संबंधित विभागांना देण्यात याव्यात. तसेच तालुक्यातील अनेक शाळा धोकादायक बनल्या आहेत. गतवर्षी सोरडी येथे जिल्हा परिषद शाळेतील छत कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाले होते. शाळेतील बेंचेसचेही यामध्ये नुकसान झाले आहे.

यापूर्वी अंकलगी, रामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.तालुक्यातील ६५ वर्गखोल्या धोकादायक आहेत. आवंढी जिल्हा परिषद शिवाजीनगर या शाळेची इमारतीचे काही दिवसांपूर्वी दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून झाले आहे. तरीही सद्यस्थितीत सदरची इमारत पूर्णपणे गळकी आहे.स्लॉबला तडे गेले आहेत. येळवी येथील रानमळा शाळा घोलेश्वर येथील तांबेवाडी,बाज येथील कोंडीगिरे वस्ती, शिंगणापूर येथील ४ वर्गखोल्या, जत नगरपरिषद हद्दीतील पवारवाडी, सोरडी, संख येथील जिल्हा परिषद शाळेच्या धोकादायक आहेत. भविष्यातील धोका टाळावा व संबंधित घटक सजग राहावा म्हणून सदरच्या खोल्या नव्याने बांधण्याची गरज आहे व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राट दारावर योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे.

भौतिक सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये दिसून येत आहे स्वच्छतागृहे, शौचालय, मध्यान्ह भोजनासाठी किचन शेड, शाळेस संरक्षक भिंत (अनेक शाळेच्या जागेत अतिक्रमणे आहेत) उदा. येथील गावभाग जिल्हा परिषद शाळा. तसेच कोरोना कालावधी नतर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश युनिट ही कल्पना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात आली आहे,या युनिट करता लाखो रुपये खर्च केले आहेत परंतु याचा विनियोग झाला नाही. विनावापर अर्धवट असलेली, हो निकृष्ट दर्जाची धूळ खात पडलेली हँडवॉश अशी ओळख बनली आहे. भौतिक सुविधा देणे,हितवह ठरणार आहे तरी या बाबतीमध्ये योग्य ते निर्णय घेण्यात यावा. या हॅन्ड वॉश च्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी त्रयस्थ गुणनियंत्रण प्रयोगशाळा अथवा संस्थेची नियुक्ती करण्यात यावी.विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण या अधिकार अंतर्गत वंचित शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे तरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शिक्षणापासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे या संख्येकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे 

गेल्या आठवड्यात झालेल्या या सर्वे मध्ये नाममात्र शाळा बाह्य विद्यार्थी दाखवण्यात आले आहेत. परंतु खरी परिस्थिती ही वेगळी आहे. जेणेकरून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावा,याबाबत जनजागृती व महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची गरज बनली आहे.या निवेदनाचा विचार करून कारवाई करावी, अशी मागणी जमदाडे यांनी केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.