Header Ads

शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर


मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 


*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*


*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास


*सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय


*चंद्रकांत पाटील-उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य


*डॉ. विजयकुमार गावित-आदिवासी विकास


*गिरीष महाजन-ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 


*गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता 


 *दादा भुसे-बंदरे व खनिकर्म 


*संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन


*सुरेश खाडे-कामगार


 *संदीपान भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन


 *उदय सामंत-उद्योग


 *प्रा.तानाजी सावंत-सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण


*रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण


*अब्दुल सत्तार- कृषी


*दीपक केसरकर-शालेय शिक्षण व  मराठी भाषा


*अतुल सावे-सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण


*शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क


*मंगलप्रभात लोढा-पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

Blogger द्वारे प्रायोजित.