Header Ads

जायंट्स सहेली ग्रुपच्या वतीने मूकबधीरांना गणवेश,खाऊ वाटप




कवठेमहांकाळ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती संचलित वात्सल्य मुक बधीर विद्या मंदिर कवठेमहांकाळ येथे जायंट्स सहेली ग्रुप ऑफ कवठेमहांकाळ यांच्या वतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटप,गणवेश वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले.


      याप्रसंगी डॉक्टर हर्षला कदम यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे,शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशा मुक्तीची प्रतिज्ञा दिली.विद्यामंदिरच्या शिक्षिका स्वाती यमगर यांनी प्रस्तावना करताना देशाच्या विकासात मूकबधिर व्यक्ती देखील अलीकडे  मोलाची कामगिरी बजावत आहेत,मूकबधिर लोक देशातील विविध क्षेत्रात मोठ्या पदावर  काम करताना अलीकडे दिसत आहेत असे मत व्यक्त केले.


  यावेळी महिला राष्ट्रवादीच्या कवठे महांकाळ शहराध्यक्षा मीनाक्षी माने,जायंट्स सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सविता देशमुख,डॉक्टर हर्षला कदम,ॲड.छाया शेजाळ,प्रज्ञा वाले,संगीता माळवदे,शाळेच्या शिक्षिका मंगल साबळे,नंदा सरगर,इतर शिक्षक,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.