Header Ads

'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत एकुंडीत ध्वज वितरण
डफळापूर :एकुंडी ता.जत येथे 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत शाळेमध्ये ध्वज वितरण करण्यात आले.ग्रामपंचायतीत हर घर तिरंगा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील शाळांमधून मोफत तिरंगा वितरण करण्यात येत आहे. 

Blogger द्वारे प्रायोजित.