Header Ads

‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थ्यांची जालिहाळ बुद्रुक येथे प्रभातफेरी


जाळीहाळ बु.,संकेत टाइम्स : भारत देशाला स्वातंत्र्य मिऴून 75 वर्ष झाली. याच महूर्तावर देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जाणार आहे. याच उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, यासाठी शुक्रवार दि 12 रोजी जालिहाळ बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळा,कन्नड शाळा अंगणवाडी व स्कोप च्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा जनजागृती विषयी विविध घोषवाक्य दिले.


     त्यात ‘ घरोघरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, हर घर तिरंगा लढा महान, माझा तिरंगा माझी शान. तिरंगे को सलामी हमारी शान है ,हर घर तिरंगा हमारी पहचान है ’ आदी घोषणा देण्यात आल्या. तिरंगा ध्वजा फडकवण्या संदर्भातील नियमांविषयीची माहिती गावातील नागरिकांना व्हावी, यासाठी सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
     याप्रसंगी स्कोप चे मुख्याध्यापक सावंत सर, जाधव सर,पवार सर, कांबळे मॅडम, मुंडे सर, तसेच मराठी व कन्नड शाळेचे सर शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, ग्रामसेवक घेरडे सर, सरपंच शालाबाई वाघमारे, उपसरपंच गणपती भोसले, सदस्य रमेश भोसले, सोसायटी चेअरमन पांडुरंग भोसले,उपसंरपच मलकरी पुजारी, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ सुनील भोसले व गावातील तरुण मंडळी उपस्थित होते.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.