Header Ads

मोरगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू


कवठेमहांकाळ: कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगांव येथे श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर श्री हरी मंडळ,शिर्के वस्ती,मोरगांव यांच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या दरम्यान श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री गुरु वैकुंठवासी ह.भ.प.तुकाराम एकनाथ काळे आजरेकर माऊली यांच्या प्रेरणेने तसेच श्री.ह.भ.प.हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगुरु अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शुभारंभ श्री ह.भ.प.कल्लाप्पा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 
              
या सोहळ्यासाठी पहाटे ५ ते ६ काकड आरती,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १२ गाथा भजन,दुपारी १ ते २ भोजन,दुपारी २ ते ५ विश्रांती,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,रात्री ७ ते ९ हरिकिर्तन आणि रात्री ९ नंतर भोजन व जागर असा दिनक्रम असणार आहे.या सोहळ्यासाठी ह.भ.प.किसन विठोबा काशीद हे व्यासपीठ चालक असणार आहेत तर गायक म्हणून रमेश सुतार,शंकर कुंभार,गुजर,परदेशी आणि डोंगरे हे ह.भ.प. सेवा करणार आहेत.मृदंगमनीसाठी ह.भ.प.सुशांत माळी असणार आहेत.हवालदार म्हणून लक्ष्मण शिर्के सेवा बजावणार आहेत.
         

या आठ दिवस चालणाऱ्या पारायण सोहळ्यासाठी सकाळच्या नाश्त्याची सोय रामचंद्र शिर्के,विठ्ठल शिर्के,नेताजी पवार,अमर शिर्के,भारत काशीद,तुकाराम शिर्के,प्रदीप पवार,रामचंद्र कुंभार,नंदकुमार कुंभार,गौरीहर नांदणीकर यांच्याकडून केली जाणार आहे.या पारायण सोहळ्यासाठी रात्रीची भोजन व्यवस्था रामचंद्र कुंभार,कल्लाप्पा कुंभार,नंदू कुंभार,कोंडीबा पाटील,बबन शिर्के,मधुकर साळुंखे,पांडुरंग शिर्के,लक्ष्मण पवार,नेताजी शितोळे,सचिन जाधव,मोहन शिर्के, आनंदा शिर्के,शिवाजी शिर्के,गणपती शिर्के,गजानन शिर्के,रामचंद्र शिर्के,केशव शिर्के,सचिन काशीद,संदीप हारगे,पिंटू मिसाळ,अजित पवार,सुशांत निकम,सुनील पवार आणि अशोक भीमराव शिर्के या वारकरी मंडळींकडून केली जाणार आहे.
        
या सोहळ्याच्या निमित्ताने श्री ह.भ.प. किसन काशीद महाराज,भागवत संत महाराज,पूर्णानंद काजवे महाराज,तानाजी साळुंखे महाराज,शुभम कदम महाराज, आण्णाप्पा मिरजकर महाराज आणि श्री ह.भ.प.श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली महाराज यांच्याकडून कीर्तन सेवा केली जाणार आहे तर यांचे मानधन दिनकर शिर्के,नेताजी पवार,शहाजी शिर्के,युवराज शिर्के,दीपक शितोळे,विठ्ठल पवार आणि विजया शिर्के यांच्याकडून दिले जाणार आहे.
         
या आठ दिवस चालणाऱ्या सोहळ्याचे व्यवस्थापन श्रीहरी विजय मंडळ,मोरगाव तसेच परिसरातील सर्व वारकरी,भक्त भाविक आणि मोरगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे.नवशक्ती मंडळ,मोरगाव यांच्याकडून या सोहळ्यासाठी स्पीकर व्यवस्था पुरवण्यात आली असून मंडप व्यवस्था मिलिंद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय शिर्के,भास्कर शिर्के,आण्णासो शिर्के,योगेश शिर्के,शरद पवार,मोहन शिर्के,विठ्ठल शिर्के व इतर वारकरी मंडळी कष्ट घेत आहेत,तरी या भक्ती सुखाचा लाभ परिसरातील सर्व भक्त मंडळी आणि ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन श्रीहरी विजय मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.