Header Ads

श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा दि.२२ रोजी आयोजित


जत : अचकनहळळी ता.जत येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा दि. २२ ऑगस्ट रोजी भरणार असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष समाधान शिंदे यांनी दिली.


         सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री बिसल सिद्धेश्वर यात्रा श्रावण महिन्यातील २२ तारखेला भरणार असून, यात्रे निमित्त भव्य कुस्त्यांचे मैदान, पळणे शर्यत, सायकल स्पर्धा, धनगरी ओव्या, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवार जत यांचेकडून खिलार जनावरे प्रदर्शन व निवड स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात्रे रोजी सकाळी साडेआठ वाजता श्रींचे पालखीचे आगमन व सकाळी साडेअकरा वाजले पासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

 
        यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार विक्रमसिंह सावंत, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बनेश्वर तसेच विजापूर येथील कंत्राटदार अण्णाप्पा गुडोडगे, बाबा शिंदे (माल वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष), बाबासाहेब कोडक(माजी प.सं.सभापती), सरदार पाटील(जिल्हा बँकेचे संचालक), विक्रम शिंदे, मोहन शिंदे(उपविभागीय पोलीस अधिकारी), जीवन बनसोडे(तहसीलदार जत), राजेश रामाघरे(पोलीस निरीक्षक जत), दिनकर खरात(गट विकास अधिकारी) यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जतपासून पाच किलोमीटरवर मंदिर असल्याने, यात्रेकरूंना यात्रेत येणे जाण्यासाठी जत बसस्थानकाच्या वतीने खास बसची सोय केली आहे.


        यावेळी अचकनहळीचे उपसरपंच भाऊसाहेब सोनुरे, माजी उपसरपंच पिंटू स्वामी, मधुकर शिंदे, देवस्थान कमिटीचे सचिव सिद्राया शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष किशन शिंदे, म्हाळू मल्हाळकर, माणिक पाटील, गिरमल माळी, श्रीरंग शिंदे, आप्पासाहेब पुजारी, सदाशिव चौगुले आदीजण उपस्थित होते
Blogger द्वारे प्रायोजित.