गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज
बाप्पाच्या आगमनाची संपूर्ण भक्तगण आतुरतेने वाट पाहत होते आणि ती वेळ काही क्षणातच येणार. बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे.यासाठी लायटींग व इतर रोशनाईच्या साहीत्यांनी संपूर्ण तयारी झालेली आहे. फक्त वाट आहे आगमनाची.संपुर्ण महाराष्ट्र श्रीगणेशाचे वाजत-गाजत आगमन होणार व संपूर्ण महाराष्ट्र सलग 10 दिवस गणरायात तल्लीन होऊन आपल्याला आगळेवेगळे वातावरण दिसून येईल.सृष्टीचे पालनहार भोले शंकर तर त्यांचे पुत्र गणपती बाप्पा विघ्नहर्ता व ज्ञानदाता आहेत.त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत श्रीगणेशाच्या भक्तीभावामध्ये तल्लीन होऊन जातात.यामुळे सलग 10 दिवस आपल्याला उत्साहाचे वातावरण दिसून येते. त्यामुळेच श्रीगणेशांना सर्वच बाबतीत प्रथम स्थान देण्यात आले आहे. गणपती बाप्पा हिंदू धर्मातील आराध्य दैवत मानल्या जाते. कोणतीही पुजा-अर्चना असो सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते.नंतरच इतर देवतांची पूजा केली जाते.कारण श्रीगणेश म्हणजे बुद्धीचा सागर,शांतीचे प्रतीक व बालगोपालांचे आवडते बालगणेश आणि सर्वांचे लाडके दैवत.देशात कोणत्याही देवी-देवतांची पुजा असो परंतु आरतीची सुरूवात गणपतीच्या आरती पासून होते.
याचाच अर्थ पृथ्वीतलावर गणेश वंदनेला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते.रावणासारख्या महाकाय शक्तीला रोखण्याचे काम मुख्यत्वेकरून श्रीगणेशांनी केले.श्रीगणेशांना अनेक नावांनी संबोधले जाते गौरी पुत्र,अष्टविनायक अशा अनेक नावांनी श्रीगणेशांची पुजाअर्चना केली जाते.गणेशजी देवता आदिदेव असल्याने त्यांचे प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार पहायला मिळतात.गणेशजीला चार हात असतात हे चारही हात म्हणजे वेगवेगळ्या दिशांमध्ये व्यापकतेचे प्रतिक मानल्या जाते.देवी पार्वती आंघोळीला गेली असता गणपतीला पार्वतीने सांगितले की माझी आंघोळ होत नाही तोपर्यंत घरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही.गणपतीने आई पार्वतीला वचन दिले की ठीक आहे.कोणालाही घरात प्रवेश करू देणार नाही.परंतु तेवढ्यात भगवान शंकरजी दारात आले आणि म्हणाले की बेटा हे माझे घर आहे मला घरात जाऊदे.गणेशजीने भगवान शंकरजीना प्रवेश नाकारला व क्रोधित होवून गणपतीचे डोके त्याच्या धडापासून वेगळे केले.
हे पाहुण आई विचलित झाली व काही क्षणातच शंकरजीला आपली चूक लक्षात आली आणि आपल्या दैवी शक्तीच्या आधारावर गणपतीच्या धड्यावर गजाचे मस्त ठेवले आणि गणपतीला जिवदान मिळाले.भगवान शंकरजीनी आपली चुक कबुल करत संपूर्ण ब्रम्हांडात गर्जना केली की पुजेचा पहिला मान गणपतीला दिला जाईल असे गणपतीला वर्दान दिले.म्हणुनच गणपतीची प्रथम पुजा केली जाते.यातुन मानवजातीला संदेश जातो की श्रीगणेशाने आईच्या आदेशाचे पालन केले त्याचप्रमाणे आपण सुद्धा आईच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.म्हणुनच लहान मुले श्रीगणेशाच्या भक्तीभावामध्ये तल्लीन झालेले दिसतात. श्रीगणेश विवाहित होते त्यांना दोन बायका होत्या एकीचं नाव रिद्धी आणि दुसरीचे नाव सिद्धी होते.यांना दोन मुलं होती शुभ आणि लाभ त्यामुळे प्रथम पुजा गणेशची होते व सोबतच शुभ-लाभ दिसून येते.यात आपल्याला सर्वत्र शुभ संकेत दिसून येतात.आपल्याला अनेक पुराणांमध्ये गणपतीचे अनेक नावे पहायला मिळतात यात एकदंत, विनायक, लंबोदर,भालचंद्र,गजानन इत्यादी विभिन्न नावांनी आपण श्रीगणेशाची आराधना करीत असतो.त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणेशांना केतू म्हणून ओळखले जाते केतू हा शांत ग्रह असल्याने संपूर्ण सृष्टीत सावलीची भुमिका पार पाडते व राहु ग्रहांच्या विरोधात सदैव ठाम भूमिका बजावीत असते.
त्यामुळेच म्हणतात विरोधाशिवाय ज्ञान नसते आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नसते.त्यामुळे गणपती देवता हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता,विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे म्हणूनच श्रीगणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणतो.भारत अनेक धर्मांनी,जाती-पंथाने विनलेला देश आहे.त्यामुळे प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने आपापल्या संस्कृती प्रमाणे सण साजरे करतांना दिसतात.भारतात प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या देवी-देवतांची महत्त्व आहे त्यापध्दतीने पुजा-अर्चना केली जाते.प्रत्येक गणेश चतुर्थीला गणेशाची आराधना करून भक्तगण उपवास करतात व आपली मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.परंतु भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेशोत्सव.गणेशमुर्तीची स्थापना करून गणेशोत्सव तब्बल 10 दिवस चालतो.या कालावधीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपल्याला झगमगाट दिसून येते.यापध्दतीने गणेशोत्सवाचा आनंद संपूर्ण भक्तगण मोठ्या गुना गोविंदाने साजरा करतात.
लोक गणेशोत्सवात इतके तल्लीन होऊन जातात की 10 दिवस कसे गेले हे कोणालाच कळत नाही.गणपती बाप्पा पुन्हा लवकर यावा यासाठी "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या"घोषणांचा गजर करत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.इंग्रजांना शह देण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरूवात केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनजागृती करून इंग्रजां विरूद्ध मोठा लढा उभा केला व आक्रमक पवित्रा निर्माण केला.त्यामुळे गणेशोत्सव हा सण स्वतंत्र लढ्यासाठी सूध्दा कारगर सिध्द झाला.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची लावलेली परंपरा आजही संपूर्ण महाराष्ट्रात दिसुन येते.लोकमान्य टिळकांनी त्याकाळी स्वातंत्र्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली.परंतु आज आपल्याला समाज घडविण्यासाठी व जनजागृतीसाठी गणेशोत्सवाला सामोरं नेण्याची गरज आहे.या अनुषंगानेच समाजात चांगले वातावरण निर्माण होईल.पुराणानुसार परशुराम एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करून कैलासी आले असता दरबार रक्षक गणेशाने त्यास अडवले व दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले.यात परशुरामाच्या परशुमुळे गणेशाचा एक दात तुटला त्यामुळे श्रीगणेशांना एकदंत सूध्दा म्हणतात असे पुराणामध्ये नमुद आहे.गणेशाला पुजेचे स्थान प्रथम असल्याने आपण पाहतो प्रत्येक मंदिरात आपल्याला गणेशाची मूर्ती दिसुन येते ते मग कोणतेही मंदिर असो.
गणेशाचे मुख्य वाहन मुशकराज (उंदीर) त्यामुळे श्रीगणेशा सोबतच उंदराची सूध्दा पुजा-अर्चना केली जाते.पुजेमध्ये मुख्यत्वेकरून दुर्वा,बेल-फुल,शम्मीपत्र, शेंदूर यांचा वापर होतो.भारतात श्रीगणेशांची अनेक मोठ-मोठी मंदिरे आहेत.त्याचबरोबर नेपाळमध्ये आपल्याला गणेशाची असंख्य मंदिरे पहायला मिळतात.कारण श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये मुख्य दारावर गणपतीची फोटो अवश्य आपल्याला दिसुन येते.आपल्याला दे्वी-देवतांनी पृथ्वीची रक्षा करण्यासाठी पृथ्वीतलावर जन्म दिला.
परंतु मानवजातीने या धरतीमातेचा दुरूपयोग केल्यामुळे पृथ्वीतलावरील निसर्गाचा दिवसेंदिवस ह्यास होत आहे.याला वाचविण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश स्थापणेपासुन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 10 दिवस वृक्ष लागवडीची मोहीम सरकार मार्फत व संपूर्ण गणेश मंडळांच्या मार्फत राबवली पाहिजे.यामुळे संपूर्ण भारतात हिरवागार गालिचा निर्माण होईल व येणारे महाप्रलय रोखण्यास श्रीगणेशाच्या आशीर्वादाने वृक्ष लागवडीची मोठी मदत होईल.यातही आपल्याला गणेशोत्सवाचा आनंद आणि श्रीगणेश अवश्य दिसून येईल.गणपती बाप्पा मोरया!
रमेश कृष्णराव लांजेवार.
मो.नं.9921690779, नागपूर.