Header Ads

डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा




माडग्याळ : एक गाव एक गणपती व डिजेमुक्त गणेशोत्सोव साजरा करावा,असे आवाहन उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार यांनी माडग्याळ येथे केले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माडग्याळ येथे गणेश मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.
पंकज पवार पुढे म्हणाले,शासनाच्या अटी,व नियमाचे मंडळानी पालन करावे.सामाजिक उपक्रम राबवावेत.कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यांची काळजी घ्यावी,असे आवाहनही पवार यांनी केले.

जतेत नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी

जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी जत आगाराची एस.टी. परिवहन विभागाची जागा असून या जागेवर बी.ओ.टी. मधून  अद्यावत असे शाॅपिंगमाॅलसह सर्व सोईनेयुक्त बसस्थानक उभे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

अतिक्रमणामुळे शेतात जाण्याचा प्रश्न
उमराणी- तालुक्याच्या ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय अतिक्रमणामुळे हे रस्ते अरूंद झाले आहेत. याचा त्रास शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. साधी बैलगाडीही शेतापर्यंत नेता येत नाही. त्यामुळे पांदण रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी आहे.

ओल्या कचर्‍यामुळे आरोग्यास धोका
जत - शहराच्या विविध भागात नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत. याठिकाणी खुल्या जागा आहेत. तेथे विविध भागातून गोळा करून आणलेला कचरा टाकला जातो. या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे परिसरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

शेगाव परिसरातील व्यावसायिक त्रस्त
जत- तालुक्यातील व्यावसायिकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागते. अनियमित वीज, केरकचरा, वाहनांची वर्दळ आदी प्रश्न त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामपंचायतीसह विविध विभागाचे याकडे दुर्लक्ष सुरू आहे.

उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची भीती
शेगाव- परिसराच्या विविध भागातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. उखडलेले रस्ते आणि गिट्टी यामुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांनाही नानाविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडून मात्र या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.