Header Ads

कवठेमहांकाळ येथे टोलमुक्ती संघर्ष समितीची आज रॅलीकवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव (ता.- कवठे महांकाळ)येथे सुरू असलेल्या टोल नाक्याच्या विरोधात कवठे महांकाळ तालुका टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने कवठे महांकाळ येथे आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

    राष्ट्रीय महामार्गाचे सर्व काम पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये,कवठे महांकाळ तालुक्यातील सर्व गावे तसेच टोलनाक्यापासून वीस किमी अंतरावर असणारी इतर तालुक्यातील गावे यांना टोलमुक्ती द्यावी,८०% स्थानिक भूमिपुत्रांना टोलनाक्यावर नोकरीस घ्यावे आदीसह विविध मागण्यासाठी सर्व पक्षीय टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कवठे महांकाळ शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

        कवठे महांकाळ शहरातील मल्लिकार्जुन देवालयासमोरील पटांगणातून जनजागृती रॅलीची सुरुवात होणार आहे.कवठे महांकाळ शहरातील युवावाणी चौक,आझाद चौक,बसवेश्वर चौक,हनुमान चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,म्हसोबा गेट ते नगरपंचायत चौक या शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघणार आहे.शेवटी तहसील कार्यालयाबाहेरील पटांगणात जाहीर सभा झाल्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.या रॅली संदर्भात तहसीलदार गोरे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना निवेदन दिले गेले आहे.


                    या रॅली मध्ये कवठे महांकाळ शहरातील तसेच तालुक्यातील सर्व गावातील सर्व पक्षीय नेते,कार्यकर्ते,मोटार चालक मालक संघटना,वडाप वाहतुक संघटना,खाजगी वाहनांचे चालक,मालक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.