Header Ads

कवठेमहांकाळ येथील नागोबा देवाची यात्रा उत्साहात


कवठेमहांकाळ : हिरव्यागार झाडीत वसलेल्या आणि अग्रणी नदीच्या काठी असलेल्या नागोबा देवाची यात्रा शेवटच्या श्रावण सोमवार निमित्ताने उत्साहात पार पडली.गेल्या काही वर्षापासून कोरोना सारख्या जागतिक महामारीमध्ये खंड पडलेली ही यात्रा यावेळी तरुण वर्गाने पुढाकार घेऊन विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या भक्तीभावात पार पाडली.           कवठे महांकाळ आणि मोरगाव यांचा मध्य असलेले या मंदिराला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.नवसाला पावणारा नागोबा अशी या मंदिराची ख्याती आहे.श्रावण महिन्यातील सोमवार,महाशिवरात्री,तसेच नागपंचमीला या मंदिरात भक्त भाविकांची मोठी गर्दी जमते.यावेळी देवाची पूजा सोमनाथ लाठवडे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच देवाला नैवद्य दाखविण्यात आला.


        या यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचा आस्वाद मोरगाव येथील मराठी शाळेतील मुलांनी तसेच कवठे महांकाळ आणि मोरगाव परिसरातील भक्त भाविकांनी घेतला.संध्याकाळी भक्तभाविकांच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.ही यात्रा शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पाडावी यासाठी सुशांत निकम,प्रदीप(बंडू) जाधव,रमेश शिर्के,संतोष जाधव,गणेश शिर्के,प्रधान शिर्के तसेच शिवप्रेमी मंडळ यांनी पुढाकार घेतला.
Blogger द्वारे प्रायोजित.