Header Ads

संत निरंकारी मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात १५६ जणांचे रक्तदान


कवठेमहांकाळ : संत निरंकारी मंडळ,देशिंग यांच्या वतीने तसेच कवठेमहांकाळ व देशिंग शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १५६ व्यक्तींनी रक्तदान केले.

         
शिबिराचे उद्घाटन मंडळाचे झोनल इन्चार्ज अमरलालजी निरंकारी यांच्या हस्ते करण्यात आले.सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे उपस्थित होते.यावेळी सेक्टर संयोजक जालिंदर जाधव,क्षेत्रीय संचालक जगन्नाथ निकाळजे,मंडळाचे गीतकार राजेंद्र क्षीरसागर,कवठे महांकाळचे ब्रँचमुखी शंकर पाटील उपस्थित होते.


        यावेळी अमरलाल निरंकारी म्हणाले,संत निरंकारी मंडळ हे आध्यात्मिक विचारधारा आहे.सर्वाचा देव एक आहे तो निर्गुण निराकार आहे,त्याला सदगुरु कृपेने पाहता येते.मंडळाच्या चॅरिटेबल फौंडेशन मार्फत स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर,आपत्ती निवारण मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.


           स्वागत प्रास्ताविक देशिंग ब्रँचमुखी अलका सुतार यांनी केले.यावेळी सरपंच आप्पासाहेब कोळेकर,याचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी रात्री झालेल्या सत्संग कार्यक्रमांमध्ये वाई येथील  प्रचारक अविनाश जाधव यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओंकार कुलकर्णी यांनी केले. नियोजन देशिंग शाखेचे सर्व सेवादल महापुरुष माता भगिनी यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.