Header Ads

ऊस पिकाला सवलत देवू,स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाला आश्वासन


सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने आधुनिकीकरणाची कास धरण्याचा आव आणत पीक पाहणी साठी सटेलाईट जीपी एस मॅपिंग सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,याला शेतकऱ्यांतून तीव्र विरोध होत आहे ही नवी प्रणाली बंद करावी या मागणीचे निवेदन कार्यकारी संचालक एस टी वाघ यांना दिले यातून ऊस पिकाला सवलत देवू तसे तात्काळ परिपत्रक काढून बँक कर्मचाऱ्यांना सूचना देतो अशी ग्वाही  त्यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे,ही पद्धत बँकेने शेतकऱ्याच्या हितासाठी आणली नसून स्कायमेट कंपनीकडून कमिशन खाण्यासाठी सुरू केली आहे.कर्जवसुली मोहीम ही केवळ शेतकऱ्यांना त्रास देवून सुरू आहे.हिम्मत असेल तर बड्या 100 धेंडाची 1,000 कोटीची वसुली करून दाखवा राजकारणी मंडळी पुढे बँकेचे अधिकारी शेळी होवून जातात त्यामुळेच बड्या धेंडाची वसुली अद्याप झालेली नाही. साखर कारखाने, सूतगिरण्या, ऑईल मिल, सोयाबीन प्रकल्प, गारमेंट आदींची कर्जे ही जिल्ह्यातील बड्या नेत्याची आहेत बहुतांश कर्जे ही थकीत आहेत ते वसूल करण्याचे धाडस बँकेने दाखवावे.


बागायती द्राक्ष डाळिंब उस हळद सह अन्य पिकांना बँक पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज देते सदर कर्ज देण्यासाठी बँक इन्स्पेक्टर पीक पाहणी करून जायचे त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जायचा मात्र आता सेतू अप च्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे वेळखाऊ प्रणाली आहे त्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे कंपनीचे अधिकारी येणार ते प्रत्यक्षात शेतात जाणार तेथून पीक पाहणी करणार त्या साठी वेळ जादा लागत असल्याने कर्ज मिळण्यास ही दिरंगाई होत आहे.

 
Blogger द्वारे प्रायोजित.