Header Ads

सांगलीत असा साजरा झाला पहिला स्वातंञ्यदिन


देशाचा पहिला भारतीय स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी सांगली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १४ तारखेच्या मध्यरात्री तोफांचे बार आणि चौघडा झाला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी गणपती देवालयात आणि गणेशदुर्ग राजवाड्यात चौघडा झाला. त्यानंतर सकाळी १० वाजता राजवाड्यात सांगलीचे संस्थानाधिपती चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 


यावेळी राष्ट्रीय तिरंगा ध्वजाबरोबर सांगली संस्थानचा ध्वजही फडकविण्यात आला होता. रात्री सर्व प्रमुख इमारतींवर रोषणाई करण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी संस्थानातील प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठीत गृहस्थ यांना गार्डन पार्टी देण्यात आली. संस्थानच्या अन्य गावांतही पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहात झाला. 


या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची कार्यक्रम पत्रिका मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.