Header Ads

डफळापूर येथे शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट सर्व्हे

 जत : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात  दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट सर्व्हे डफळापूर पाटोळे गली, बस स्टॅण्ड परिसर करण्यात आला. गृह भेटी दरम्यान डफळापूर नंबर १ चे संजय राठोड सर,शिक्षण विस्तार अधिकारी  टी एल गवारे,विषयतज्ज्ञ श्री सुरेंद्र सरनाईक  यांनी भेट दिली.        
  
       या सर्वेक्षणात दिनांक ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीमध्ये शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी,बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने,बालमजूर तसेच स्थलांतरित कुटूंबामधून करण्यात याव्यात.तसेच मागास वंचित गटातील व अल्पसंख्याक गटांतील वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात यावी.जत तालुक्यातील सर्व खेडे, गाव , शहर,वाडी ,तांडे व शेतमळ्यात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य़  बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात यावा.महिला बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांनी ही बालगृह निरीक्षणगृह विशेष दत्तक संस्था यामधील बालकांचाही या मिशन ड्रॉपआऊट मध्ये समावेश करण्यात यावा,एकही शाळाबाह्य स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने शिक्षण यंत्रणेतील सर्वानीच प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे . मिशन झीरो ड्रॉपआऊट सर्वेक्षणाचा अहवाल पंचायत समितीला सादर करायचा आहे
Blogger द्वारा समर्थित.