Header Ads

शिवसेनाचे तालुकाध्यक्ष संजय सांवत पायी निघाले पंढरीला

 


जत : जिल्हा परिषदेचे माजी सभापती व शिवसेनेचे पश्चिम विभाग संजय सावंत सपत्नीक पंढरीला कार्तिकी वारीसाठी शुक्रवार दि.१२ रोजी पायी निघाले.त्यांच्यासमवेत बनाळी व आवंढी येथील वारकरी सहभागी झाले आहेत.शिवसेनेचे जत तालुका पश्चिम 
विभाग प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सावंत हे पत्नी सौ रुपाली सावंत यांच्यासह पंढरीच्या कार्तिकी वारीला बनाळी येथून पायी निघाले.बनाळीतील श्री.बनशंकरी मंदिरात भजन केल्यानंतर बनाळीसह आवंढीतील वारकरी या पायी दिंडीत सहभागी झाले.



पंढरीची वारी केल्यानंतर प्रसाद व तीर्थ घेऊन सावंत सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत भेटणार आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक अमित दुधाळ,इराण्णा पाचंगे,राहुल पाटील,बी,आर.सावंत,दत्तात्रय लिगाडे,तुकाराम जाधव,साहेबराव सावंत,केराप्पा माळी, नाना माळी,दाजीराम जाधव,अनिल सावंत,रंगराव सावंत,आवा लिगाडे,सज्जन सावंत,महेश कोडग, निरंजन कोडग,आकाश कोडग,विठ्ठल कोडग,राहुल काशीद जगनाथ गेजगे उपस्थित होते.



संजय सावंत यांनी मागील वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा व आघाडीचे शासन पाच वर्षे टिकावे यासाठी सहपत्नी ग्रामस्थाबरोबर अनवाणी नोंव्हेबर २०१९ ला पायी वारी केली होती.दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रूपाने झाल्याने सावंत यांनी केलेल्या पायी वारीचे सार्थक झाले होते.ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सांवत यांना सहपत्नी आमंत्रण मिळाले होते.गतवर्षी कोरोनामुळे त्यांना वारी करता आली नव्हती यंदा ते पायी पंढरपूरकडे निघाले आहेत.
Blogger द्वारे प्रायोजित.