Header Ads

कुलाळवाडीत चार हजारहून अधिक झाडाचे संवर्धन

संख : कुलाळवाडी (ता. जत) येथील
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत गेली पाच वर्षांपासून राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबविला आहे. शाळेच्या परिसरात 540 झाडांचे जतन व संवर्धन केले आहे. पावसाळ्यात ही वनराई हिरवाईने नटलेली आहे.


शालेय परिसर, ग्रामपंचायत परिसर, कुलाळवाडीतील खंडोबा देवस्थान, बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर हून अधिक परिसरावर व विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या घराच्या सभोवताली, शेताच्या बांधावर परिसरात 4 हजार 268 झाडांचे देशी प्रजातीच्या विविध वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे. 

शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून सुमारे दोन हजार फुट पीव्हीसी व पाच हजार‌ फुटहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाईपलाईन केली आहे.विद्यार्थी दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक बियांचे संकलन करून याद्वारे रोपवाटिका तयार केली आहे. तसेच सीड बॉल्स तयार करतात.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव असूनदेखील विद्यार्थी व शिक्षकांनी 50 हजार सीड बॉल्स तयार केले आहेत. 

शाळेच्या या उपक्रमास ग्रामस्थ तसेच वृक्षप्रेमींचा भरघोस सक्रिय पाठिंबा लाभला आहे.सध्याच्या काळात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन कुलाळवाडीत हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातुन पर्यावरण रक्षन आणि भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व सांगणे असा दुहेरी उद्देश साध्य केला जात आहे.

ग्रामस्थांनीही यासाठी
शाळेला व संयोजकांना मदत केली आहे. यामुळे गत पाच वर्षे या उपक्रमात सातत्य राहिले आहे. येत्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला आहे. यासाठी समाजात जनजागृतीचा कार्यक्रमही घेतला जाणार आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.