Header Ads

मागासवर्गीय समाजाचा निधी तात्काळ परत द्या; दलित पँथर

जत,संकेत टाइम्स : मागासवर्गीय समाजासाठी असणारे महाज्योतीचे 125 कोटी व समाज कल्याणचे 105 कोटी रुपयांचे निधी वापराविना शासनाकडे परत करून संबधित अधिकाऱ्यांनी बहुजन समाजाचे अतोनात नुकसान केले आहे,तो निधी पुन्हा समाजकल्याण विभागा मार्फत बहुजन समाजाला द्यावा, या मागणीचे निवेदन दलित पँथरच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे कि,
महाविकास आघाडी शासनाकडून‌ 
आरक्षण व सवलती संपुष्टात आणण्यात येत आहेत.घटनेने दिलेले मागासवर्गीस पदोन्नतीचे आरक्षणही रद्द केले आहे. अशा निष्काळजी पणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षणही संपुष्टात आले आहे.



शासनाकडून मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शासनाकडून महाज्योती, समाज कल्याण यांच्याकडून खर्च करण्यात येतो.तो खर्च न करता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे परत पाठविण्यात आला आहे.यामुळे मागासवर्गीय समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.अनुसुचीत जाती व बौध भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय अन्य विशेष
मागासवर्ग समाजाची सामाजिक,आर्थिक, शैक्षणीक प्रगती रोखण्याचे महाविकास आघाडी सरकार करत आहे,


त्याचे हे धोरण आरक्षण विरोधी व घटना बाह्य आहे.
या संबंधीत खातेचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुडे,डॉ शाम तगडे,धमज्योती
गाजीगया, प्रशांत.बी.भवारे,यांना तात्काळ पदावरुन हटवावे,गलथान कारभार करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. न्यायालयीन चौकशी व्हावी.

मागासवर्गीय शासनाने तो निधी तात्काळ संबधित विभागाकडे वर्ग करून मागासवर्गीय समाजाच्या विकास योजनासाठी खर्च करावा,अन्यथा दलित पँथरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे,भूपेंद्र कांबळे यांनी यावेळी इशारा दिला आहे.
यावेळी जत तालुका अध्यक्ष अमर कांबळे, महासचिव प्रमोद काटे,सचिव विकी वाघमारे,कार्याध्यक्ष सुनिल कांबळे,राहूल ऐवळे उपस्थित होते.



मागासवर्गीय समाजाचा निधी तात्काळ परत द्या,या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देताना दलित पँथरचे पदाधिकारी

Blogger द्वारे प्रायोजित.