Header Ads

बँकेने 6 टक्के दराने कोविड कर्ज द्यावे ; बसवराज येलगार

जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या या नाजुक काळामध्ये शिक्षकांच्या कामधेनू असणाऱ्या शिक्षक बँकेने सर्व सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या,कोविड कर्जाचा धरतीवर 6 टक्के व्याज दराने दहा लाख रुपये कोविड कर्ज द्यावे,अशी मागणी शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी केली.
येलगार म्हणाले,कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक शिक्षक आर्थिक अडचणीत आहेत.काही शिक्षक व कुटुंब कोरोना बाधित आहेत. 


त्यांनी दवाखाने व औषधोपचारासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.त्यामुळे त्यांना पैशाची गरज आहे.म्हणून शिक्षक बँकेने शिक्षक बांधवाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दहा वर्षे मुदतीवर सहा टक्के दराने दहा लाख रुपये कर्ज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.तसेच सर्व कर्जावरील व्याजदर एक अंकी करावा, डिव्हिडंट दोन अंकी द्यावा, भविष्यात बँकेत नोकरभरती करू नये, अशीही मागणी श्री.येलगार यांनी केली.
Blogger द्वारे प्रायोजित.