Header Ads

शिक्षक बँकेच्या कारभाऱ्यांना कायमठेवी परत देण्याचा विसर ; दिगंबर सांवत

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी शिक्षकांना कायम ठेव परत देऊ अशी घोषणा केली होती.मात्र जनरल सभा होऊन अनेक महिने झाले तरी सत्ताधारी मंडळी कायम ठेव देण्याबाबत उदाशीन आहे.याबाबत सभासदांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.शिक्षक बँकेच्या कारभारी मंडळी यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात,असा आरोप शिक्षक भारतीचे जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केला आहे. 
         


दिगंबर सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना लवकर कायम ठेव परत केली तर या कोविडच्या काळात आर्थिक मदत होईल.शिक्षक बँक ही पगारदार नोकरांची बँक आहे,स्वतःचे भाग भांडवल आहे. शिक्षक बँक नेहमीच नफ्यात आहे. बँकेची वसुली 100 टक्के आहे.तरीही व्याजदर मात्र कमी केला जात नाही. कारभाऱ्यानी व्याजदर कमी करावा. इतर सहकारी बँका राष्ट्रीयीकृत बँका या पगारदार नोकरांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करतात,तसेच शिक्षक बँकेने कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करावा अशी मागणीही आहे. 



कायम ठेवीची रक्कम देण्याबरोबरच शेअर्स रक्कम ठराविक ठेवून सर्व रक्कम परत करावी कर्जातून घेतला जाणारा हजारी एक रूपया ही योजना बंद करावी.सभासदांचा जमा असलेल्या मयत फंडाच्या रक्कमा देखील परत कराव्या गेली दोन वर्षे ठेवीच्या व्याजदरात कपात केली आहे,त्यामुळे व्याजाचा सरासरी दर नक्कीच खाली आहे.त्यामुळे कर्जाचा व्याजदर तात्काळ कमी करावा,


सभासद जागृत आहेत.त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे कारण सांगून वेळ काढून उपयोग नाही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सभासद बंधू भगिनींना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न महत्वाचा आहे.
यावेळी बाळासाहेब सोलनकर,मल्लाया नांदगाव,नवनाथ संकपाळ,जितेंद्र बोराडे, अविनाश सुतार,रावसाहेब चव्हाण, धानाप्पा कमते,विनोद कांबळे उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.