Header Ads

औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपात मागासवर्गीय प्राधान्याने द्या रिपाइं ; प्रादेशिक अधिकारी श्रीमती सरनाईक यांना निवेदन

जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील भूखंड मागासवर्गीय उद्योजकांना वाटप करावेत,अशी मागणी आरपीआयच्या वतीने औद्योगिक विकास महामंडळ सांगली प्रादेशीक अधिकारी श्रीमती के.एन.सरनाईक यांना निवेदनाद्वारे केली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,सांगली लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष संदेश भंडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सरनाईक यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. 

संजय कांबळे म्हणाले, अनेक उद्योग सध्या बंद आहेत.औद्योगिक भूखंड अनेकांनी भाड्याने, कराराने इतर भांडवलदारांना दिले आहेत.त्याची चौकशी झाली पाहिजे, बेकायदेशीर दिलेल्या भूखंडांच्या बाबतीत तात्काळ निर्णय व्हावा. राज्य शासनाने मागासवर्गीय उद्योजक व कारखानदार यांच्या विकासासाठी प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये मागासवर्गीयांना राखीव भूखंड ठेवून ते भूखंड मागासवर्गीय उद्योजकाना देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्या सांगली जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रा मध्ये मागासवर्गीय उद्योजकांना राखीव असलेले भूखंड देण्यात येत नाहीत,तरी जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी झोन मधील कमर्शियल व उद्योग भूखंड मागासवर्गीय होतकरू उद्योजकांना देण्यात यावेत.


संदेश भंडारे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक उद्योग धंदा नसल्यामुळे शेतात मोलमजुरी किंवा मुंबई पुण्याला हॉटेल वेटर म्हणून काम करत आहेत.युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी बाबतीत आता रिपब्लिकन पक्ष ठोस भूमिका घेणार असून राज्य शासनाच्या औद्योगिक महामंडळाच्या योजना योग्य पद्धतीने अंमलात आणाव्यात अन्यथा सगळ्या कारभाराची तपासणी करून सगळा भोंगळ कारभार बाहेर काढू असा इशाराही देण्यात आला.यावेळी विजय बुवा, वावरेसाहेब उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपात मागासवर्गीय प्राधान्याने द्यावेत,या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.