Header Ads

बेवनूर,वाळेखिंडी, नवाळवाडीला टेंभू योजनेतून पाणी देण्याचा प्रयत्न ; अमोल डफळे

जत,संकेत टाइम्स : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेवनूर,वाळेखिंडी, नवाळवाडी,सिंगनहळ्ळी या गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावे यामागणीचे निवेदन या भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिले होते.
त्यानुसार नेते शिंगे व या गावातील लोकप्रतिनिधी, शेतकरी यांच्यासोबत प्राथमिक बैठक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जत कार्यालयात संपन्न झाली.


यावेळी पालकमंत्री ना.पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे,टेंभू सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता श्री.हारूगडे,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,महादेव शिंदे,एन.डी.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या गावांना प्राथमिक टेंभू योजनेतून पाणी देण्यासाठी संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.लवकरचं याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे अहवाल पाठवून हा विषय मार्गी लावण्यात येईल,असे डफळे यांनी सांगितले.

बेवनूर,वाळेखिंडी, नवाळवाडी परिसरात पाणी सोडण्याबाबत बैठक संपन्न झाली.


Blogger द्वारे प्रायोजित.