Header Ads

सनमडी (नरळेवाडी)येथे 'पोषण आहार' किटचे वाटप

जत,संकेत टाइम्स : सनमडी (नरळेवाडी)ता.जत येथील गरजू, निराधार महिलांना राजमाता जिजाऊ ग्रुप, पुणे. यांच्यामार्फत पोषण आहार कीट वाटप करण्यात आले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक निराधार कुटुंबाला जीवन जगणे अवघड झाले आहे.


अशा परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजमाता जिजाऊ ग्रुपने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.राजमाता जिजाऊ ग्रुपच्या सौ. सुरेखाताई आवटे, सविताताई खांडेकर व सौ.वंदनाताई सांगोलकर या मैत्रिणींनी मिळून शिवजयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी रोजी "राजमाता जिजाऊ ग्रुप" ची स्थापना केली. या ग्रुप मार्फत दर महिन्याला गरजू निराधार महिलांना अन्नधान्य, किराणामाल देऊन मदत करण्याचा संकल्प केला आहे.
यापुढे जाऊन समाजातील मुला, मुलींच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावणार आहोत असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ ग्रुपच्या सौ रेखाताई आवटे यांनी केले.


पोषण आहार किट संबंधित लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द करण्यात आले.यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे(शि.द).तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर,जत तालुका प्राथमिक शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष गजानन खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते तानाजी नरळे,परमेश्वर नरळे, सिताराम नरळे व लाभार्थी शिलवंता नरळे,चांगुना नरळे उपस्थित होत्या.



सनमडी (नरळेवाडी)येथे 'पोषण आहार' किटचे वाटप करण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.