Header Ads

आशांचे आमदारांच्या‌ कार्यालयासमोर निदर्शने

जत,संकेत टाइम्स : आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या विविध मागण्यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
तालुक्यात 305 आशा व 16 गटप्रवर्तक आहेत.कोरोना काळात या आशांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे.


मात्र त्यांना नाममात्र मोबदला मिळत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा,किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी,आशांना 18 हजार,गटप्रवर्तकांना 21 हजार पगार द्यावा.कोविड काळातील अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा,आदी मागण्याचे निवेदन माजी सभापती बाबासाहेब कोडग,आमदार सांवत यांचे सचिव बंडू शेख यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मिना कोळी,वनिता भुसनूर,सुंनदा सातपुते,संगिता माळी,हेमा ईम्मनवर आदीसह तालुक्यातील सर्व आशा उपस्थित होत्या.


आंशाच्या विविध मागण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Blogger द्वारे प्रायोजित.