Header Ads

अज्ञात वाहनाच्या धडकेत आरेवाडीचा युवक ठार

जत,संकेत टाइम्स : विजापूर-गुहागर महामार्गावरील धावडवाडी नजिक अज्ञात वाहनाने ठोकरल्याने आरेवाडीतील युवकांचा मुत्यू झाला.प्रमोद तातोबा कोळेकर (वय-30,रा.आरेवाडी)असे मयत युवकांचे नाव आहे.घटना शनिवारी पहाटे‌ 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अधिक माहिती अशी,आरेवाडी येथील प्रमोद कोळेकर हा युवक धावडवाडीकडे चालत निघाला होता.सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नागजकडून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने प्रमोद यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांच्या जागेवरच मुत्यू‌ झाल्याचा अंदाज आहे. काही नागरिकांनी त्यांना तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पुर्वीच त्यांचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कळविले.जत पोलीसात बिरा बाळू कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे, अधिक तपास कॉन्टेबल अमोल चव्हाण अधिक तपास करत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.