Header Ads

जतेत नवे 2 रुग्ण,जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटली

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. शनिवारी फक्त दोन रुग्ण आढळून आले आहेत.कासलिंगवाडी 1,शेगाव 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे तालुक्यातील एकूण बाधित संख्या 2432 झाली आहे.सध्या 61 रुग्ण उपचाराखाली आहेत.जत तालुक्यात शुक्रवारी अचानक 26 बाधित रुग्ण आल्याने तालुक्याची चिंता वाढली होती.दरम्यान जिल्ह्यात रुग्ण संख्या खालावली आहे,शनिवारी 128 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सांगली महापालिका 37,आटपाडी 15,कडेगाव 1,खानापूर 11,पलूस 4,तासगांव 9,जत 2,कवटेमहांकाळ 5,मिरज 16,शिराळा 1,वाळवा 37 असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सांगली महानगर पालिका हद्दीतील एकाचा मुत्यू झाला आहे.जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 49,555 इतकी झाली आहे.सध्या जिल्ह्यातील 766 रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.