Header Ads

येळदरीतील जळीतग्रस्त कुंटुबियांना तुकाराम बाबाची मदत‌

जत,संकेत टाइम्स : येळदरी (ता.जत)येथील सिद्राम माने यांना हभप तुकाराम बाबा‌ यांनी रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला.माने यांच्या झोपडीवजा घराला शुक्रवारी आग लागून झालेल्या नुकसानीत मोरे कुटूंब उघड्यावर पडले.माने कुटूंबीय हे गरीब कुटूंब आहे.


बागेवरच त्यांच्या कुटूंबियांची गुजराण चालत होती. या आगीत संसारपयोगी साहित्य, रोख चार लाखाची रक्कम, तीन दोन सोने, शेळी, दोन कोकरु जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले होते. ही बाब समजताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी धीर देत मानव मित्र संघटनेच्या वतीने रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला. यावेळी मंडल अधिकारी संदीप मोरे, संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सूरज मणेर, विक्रम कांबळे, अमोल कुलकर्णी, तुकाराम बंडगर, शिवाजी देवकते, बाबा शिंदे, संभाजी सरगर, राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.येळदरीतील जळीतग्रस्त कुंटुबियांना तुकाराम बाबाची मदत‌ केली.

Blogger द्वारे प्रायोजित.