रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण कायम | जत तालुक्यातील नवे रस्तेही व्यापले,बांधकामच्या अधिकाऱ्यांनी केले सर्वांना गप्प
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत.जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे गेल्या वर्षी झालेल्या सर्वच रस्त्याची कामे दर्जाहिन झाली आहेत.काम चालू असतानाही खड्डे पडले होते.आतातर रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे.
अपघातांचे प्रमाणही वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे.अनेक नव्याने केलेले रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत.तालुक्यातील अपवाद वगळता बहुतांश रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकजण जखमी तर काही ना प्राणाला मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत, तर खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनांचे पाट् स तुटल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सध्या तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ते एक प्रकारे तालुक्याच्या ग्रीन झोनला अथवा औद्योगिक क्षेत्राला या रस्त्यामुळे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे रस्त्याची कामे इतकी निकृष्ट व दर्जाहीन होत असतानाही एकाही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेता,कार्यकर्ता,युवा नेते,समाजसुधारक, माध्यमे बोलत नाहीत,हे विशेष आहे.परिणामी यांच्या चुप्पीमुळे सामान्य नागरिक,वाहनधारकांना जीव धोक्यात घालून अशा रस्त्यावरून जावे लागत आहे.