मुंबई : गेल्या सहा दिवसांत 13 हजार रुग्ण,आकडेवारी धक्कादायक रूप धारण करणारी आहे.मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलं असून,3 हजार 62 रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे महापालिकेनं मुंबईतील 305 इमारती सील केल्या आहेत.
राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 13 हजार 912 रुग्ण मुंबईतील आहेत.