Header Ads

ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ; दिनकर पंतगे

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुका हा विस्ताराने आणि लोकसंख्येने मोठा आहे या तालुक्यामध्ये लिंगायत समाज एनटी समाज इतर मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे जत विधानसभा हा 288 वा शेवटचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात ओबीसीची जात निहाय जनगणना करणे आवश्यक आहे,ती झालीच पाहिजे,अशी मागणी ओबिसीचे नेते दिनकर पंतगे यांनी केली आहे.




पंतगे म्हणाले, जनगणना झाल्यास नेमक्या कोणत्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे,हे दिसून येईल यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. जनगणना सरकारमार्फत न झाल्यास बळावर करण्याची तयारी ओबीसी संघर्ष समितीने दाखविली आहे.या तालुक्यातील ओबीसी बांधव जागे झाले असून त्यांना आता अस्तित्वाची जाणीव झाली आहे.


ओबीसी समाजाची ओबीसी मधील समाजांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची वेगळी अस्तित्व आणि स्वतंत्र वलये निर्माण करायचे आहेत. 

Blogger द्वारे प्रायोजित.