जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील बसस्थानक परिसरात विद्रुपीकरण केलेले अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली.यावेळी उमदी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.तालुक्यातील जतनंतर मोठे गाव असलेल्या संखमध्ये अनेक व्यवसायिकांनी रस्त्याला ठेचून खोकी टाकून विद्रुपीकरण केले होते.त्यात पानटपरी,चहागाडे,इलेक्ट्रिकल दुकानांचे टाकून अतिक्रमण केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सर्व अतिक्रमण धारकांना आठ दिवसात अतिक्रम काढण्याच्या लेखी नोटिसा दिल्या होत्या.
पंरतू व्यवसायिकांनी अतिक्रमणे न काढल्याने पोलीस बंदोबस्त घेत ही सर्व अतिक्रम केलेली खोकी हटविली.यामुळे सोन्याळ-विजापूर महामार्गाने मोकळा श्वास घेतला.यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.उपअभिंयता डी.पी.डोंगरे,शाखा अभियंता पी.पी.शिंदे,उमदी पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय कोळेकर,कनिष्ठ अभियंता आर.बी.राजगे,स्थापत्य अभियंता डी.एम.कारंडे,हवलदार नागेश खरात, मैलकुली मजूर या कारवाईत भाग घेतला