78 लाखाच्या‌ फसवणूकीतील संशयिताला अटक
इस्लामपूर : जमिन खरेदी/विक्री व्यवहारात 78‌लाख‌ 80 हजार रूपायची फसवणूक गुन्ह्यातील आरोपी संजय रामचंद्र घाडगे (वय 42, रा दहयारी,घाडगे मळा, ता.पलूस याला पोलीसांनी ताब्यात घेतले. सुमारे 3 वर्षापासून तो परागंदा झाला होता त्याचा शोध इस्लामपूर पोलीस ठाणेचे पथक त्याचा शोध घेत होते.


इस्लामपूर कचरे गल्लीत राहणारे परंतु मुंबई येथे राहणेस असलेले श्रीकांत कृष्णा डांगे यांची जमीन परस्पर 78,80,000 रुपयेचे खरेदी,विक्रीचे गैरव्यवहारात संजय‌ घाडगेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.शनिवारी संशयित संजय घाडगे हा त्याचे घरी येणार असल्याबाबत गोपनियरित्या माहीती मिळाली होती.


त्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे सपोनि.पी.पी.साळुखे यांच्या पथकाने त्यांच्या मुशक्या आवळल्या.सोमवारी संशयीत घाडगे याला न्यायालयात भेटविले असता त्याची 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.