Header Ads

बीएलओ कामांची शिक्षकावर सक्ती करू नका ; शिक्षक भारतीची मागणी


जत,प्रतिनिधी : बीएलओ कामांची शिक्षकावर सक्ती करू नये, असे स्पष्ट असतानाही शिक्षकांना सक्ती केली जात आहे.बीएलओच्या कामावर शिक्षक भारतीने बहिष्कार घातला आहे. बीएलओ कामाची शिक्षकांवर सक्ती करू नये, अशी मागणी दिगंबर सावंत यांनी केली आहे.शिक्षक भारतीच्यावतीने जतचे
गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत, मल्लय्या नंदगाव,नवनाथ संकपाळ, जितेंद्र बोराडे उपस्थित होते.उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षकांना बीएलओच्या कामाची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय दिलेला असताना शिक्षकांना सक्तीने बीएलओच्या ऑर्डर देण्याचे काम जत येथे करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 
शिक्षकांना अशैक्षणिक काम लावू नयेत, असा शासन निर्णय होऊन ही शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवले जात आहे. शिक्षकांना फक्त जनगणना दिगंबर सावंत यांनी सांगितले.व प्रत्यक्ष निवडणुकीचे तीन दिवस या व्यतिरिक्त काम लावू नये असे असताना बीएलओचे काम लावले जात आहे त्यामुळे जत तालुका शिक्षक भारतीच्यावतीने या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शिक्षकांनी बीएलओचे काम करू नये असे दिगंबर सांवत म्हणाले.

Blogger द्वारे प्रायोजित.