Header Ads

दिवाळी उत्साहात..| घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्येमंगलमय वातावारणात लक्ष्मीची मुहुर्तावरची पूजा.


जत,प्रतिनिधी : घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सनईच्या सुरात मंगलमय वातावारणात लक्ष्मीची मुहुर्तावरची पूजा.. व्यापाऱ्यांकडे वह्य़ांचे पूजन, नवीन वस्तूंची खरेदी, मिठाई वाटप.. फटाक्यांची मनमुराद आतषबाजी.. एकमेकांना शुभेच्छा व फराळाचा आस्वाद.. अशा आल्हाददायी वातावरणात जतेेेत लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे झाले. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी नागरिकांनी मुक्त हस्ते फटाके उडविल्यामुळे रंगबेरेगी आणि आकर्षक फटाक्यांमुळे आसमंत भरून गेला होता.


 


 


दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा, घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सकाळपासून लक्ष्मीपूजनाची तयारी केली जात होती. सकाळपासून धामधूम आणि उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध भागातील बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीची मूर्ती आणि इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. विशेषत:बिळूर,स्टेट बँक,सह मुख्य चौकात अनेकांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे सकाळच्यावेळी त्या भागात गर्दी झाली होती. घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठांमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यात आल्यानंतर सायंकाळी शहरासह इतरही ठिकाणी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी सहानंतर आसंमत फटाक्यांच्या आवाजाने निनादून गेला होता. फटाक्यांच्या आवाजाबाबत मर्यादा आखून दिलेल्या विक्रेत्यांनी मोठय़ा आवाजाचे फटाके विक्रीसाठी ठेवले होते आणि नागरिकांनी नियमाचे पालन न करता फटाके उडवल्याचे चित्र दिसत होते. फटाक्याच्या आवाजाने आणि शोभेच्या फटाक्यामुळे शहरातील वातावरून दुमदुमून गेले होते.शहरात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. व्यापारी प्रतिष्ठानांमघ्ये लक्ष्मीपूजनाच्यावेळी व्यापाऱ्यांनी वहीखात्याची पूजा केली.

 


सकाळच्यावेळी सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शहरातील विविध भागात दिवाळीनिमित्त फराळाची जणू मेजवानी दिली. नागरिकांनी वस्तींमध्ये रांगोळ्या रेखाटल्या होत्या.अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठय़ा रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण करतानाच हातात असलेल्या मोबाईललाही विश्रांती नव्हती. व्हॉटसअ‍ॅपवर शुभेच्छा संदेश दिले जात होते.प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेला दीपोत्सव अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे.

 

 


दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या भगवान विष्णूने वामन रूप धारण करून बळीराजाला तीन पायात दान मागितले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भूलोकवासी त्यांच्या आठवणीनिमित्त प्रत्येकवर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते. 

 

 


दिवाळीच्या एक दिवस अगोदर चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंद झालेल्या गोकुळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीला बिहारमधील पावापुरी येथे शरीर त्यागले. महावीर संवत्सर  त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.