Header Ads

ऐन दिवाळीच्या तोंडावर एटीएममध्ये ठणठणाट | शोभेची वस्तू : नागरिकांची शहरात ससेहोलपट


  


जत,प्रतिनिधी :  दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र,आयसीआयसी,एचएफडीसी बँक यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या को-ऑपरेटिव्ह बँकांचे एटीएम उभारण्यात आलेले आहेत.

 

 

 

बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले. काही एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याचे आढळून येत आहे.अनेक ग्राहकांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.