वर्षाअखेर सोन्याचा दर 65 हजारांपर्यंत जाणार ?

 


 

 


नवी दिल्ली : सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय बॅंकांची व्याज स्वस्त ठेवण्याची पॉलिसी आणि भारतातील सोन्याची मागणी पाहता या वर्षात चौथ्यांदा सोन्याची मागणी वाढलीय असं मोतीलाल ओस्वाल फायनान्स सर्व्हिसेसने म्हटलंय  


 


सोन्यात गुंतवणीकीसाठी चांगला पर्याय असल्याचे फर्मने म्हटलंय. गेल्या एक दशकात भारतात सोन्याने 159 टक्के रिटर्न दिला. घरेलू शेअर निफ्टीने या दरम्यान 93 टक्के रिटर्न दिले असे रिपोर्टमध्ये म्हटलंय. 


 


 


सोन्याचा भाव मोठ्या अवधीत 65-67 हजार रुपये 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. सोन्याची मागणी तिसऱ्या तिमाहीत 30 टक्के पडल्यानंतर चौथ्या तिमाहीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण यादरम्यान सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झालीय.