Header Ads

संख-खंडनाळ बोर नदी पात्रातील रस्ता गेला वाहून 




 

 

 


संख,वार्ताहर : जत तालुक्यातील संख-खंडनाळ बोर नदी पात्रातील रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे.पाऊस महिन्यापासून थांबला आहे.पण रस्ता दुरुस्ती करण्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.महिला,वयोवृद्ध व्यक्ती,शाळकरी मुले,

शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करीत पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.पूर्व भागातील संख खंडनाळ हा 4 कि.मी रस्ता आहे.हा रस्ता 2002 मध्ये आमदार फंडातून खडीकरण करण्यात आले आहे.

 

 

 


त्यानंतर मात्र या रस्त्याची कोणतीच काम झालेले नाही.संख पासून दक्षिणेला 1 कि.मी अंतरावर बोर नदी आहे.संख-खंडनाळ रस्तावरील बोर नदी पात्रात दगड मुरुम टाकण्यात आला होता.आँक्टोंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बोर नदी दुथडी भरुन वाहत होती.आठवडाभर रस्ता बंद होता.बोर नदीतील जोरदार पाण्याच्या प्रवाहाने मुरुम,माती वाहून गेली आहे.पात्रात खोल खड्डे,दगड उघडे पडले आहेत.त्यामुळे खंडनाळ येथे जाणाऱ्या व त्या परिसरातील वस्तीवरील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.

 

 


 

खंडनाळ संख रस्त्यावर जाधववस्ती,कुलकर्णीवस्ती,वाघोलीवस्ती,सर्जेवस्ती,जमादार यांची शेती आहे.रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी प्रमुख रस्ता आहे.नदीपात्रातून दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना मोठी अडचण झाली आहे.शेत माल,शेतीसाठी लागणारी अवजारे, खते घेऊन जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नऊ किलोमीटर वळसा घालून संख येथे यावे लागते.तसेच पायी ये-जा करणा-यामहिला,वयोवृद्ध व्यक्ती,शाळकरी मुले यांना जीवघेणा कसरत करीत वाहणाऱ्या पाण्यातूनच जावे लागत आहे.याकडे बांधकाम विभागाने लक्ष आपत्कालीन व्यवस्थापनातून दुरुस्ती करुन मिळावा.अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

 

 

 

 

 


 

जत तालुक्यातील संख-खंडनाळ बोर नदी पात्रातील रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे.


 

 




Blogger द्वारे प्रायोजित.