Header Ads

मिरजेच्या तरूणाचा खून,आरोपीला अटक

  

सांगली : सांगली येथील पुष्पराज चौकाजवळील काळ्या खणीजवळ मंगळवारी मध्यरात्री मिरजेतील टाकळी रोड येथे राहणाऱ्या प्रदीप राजू हंकारे (वय 23),या तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता.मयत प्रदिप हंकारे हा मंगळवारी आपल्या दुचाकीवरून सांगलीत आला होता.

 

 

 

 


 

त्याचा मृत्तदेह बुधवारी सकाळी काळ्या खणीजवळील झुडपात आढळून आला होता.जवळच त्याची दुचाकी मोटार सायकलही फेकून देण्यात आली होती.याप्रकरणी पोलीसांनी कसोशीने तपास करत संशयित आरोपी दत्तात्रय परशुराम सलगर(वय 28,रा.अहिल्यादेवी स्मारक विजयनगर,सांगली)याला ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांने अन्य एका साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबूली दिली आहे. पोलिस सलगर यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

 

 


Blogger द्वारे प्रायोजित.