Header Ads

करजगीतील युवकांच्या मुत्यू प्रकरणी दोघावर गुन्हा दाखल

 



 


करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथे बोर नदीत वाहून गेलेल्या सनमडी येथील परमेश्वर उर्फ पिंचू भीमू धायुगडे यांच्या मुत्यूप्रकरणी ट्रँक्टर चालक सोमू लायाप्पा कळी,व अग्रो वॉटसन चेन्नई दुध संकलन केंद्र करजगीचा व्यवस्थापक निंगाप्पा जोगर या दोघाविरूधात उमदी पोलीसांनी मुत्यू जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे.


 



करजगी येथील चेन्नई डेअरीला सनमडी परिसरात संकलन केलेले दुध करजगी येथून भिवर्गी रोडवरील डेअरीस घालण्यासाठी परमेश्वर व ट्रँक्टर चालक सोमू बोर नदीतील पाण्यातून जात असताना ट्रँक्टर पलटी होऊन परमेश्वर वाहून गेला होता.तीन दिवसानंतर त्यांचा मृत्तदेह आढळून आला आहे.नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही धोका पत्करून दुध घालण्यासाठी धाडस करण्यात आले. त्यात ट्रँक्टरमध्ये ट्रॉलीत बसलेला टेम्पो चालक असलेल्या परमेश्वराचा दुर्देवी मुत्यू झाला.या मुत्यूस कारणीभूत धरत दोघावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंटू या भाऊ नितीन धायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रँक्टर चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


 


 


चेन्नई डेअरीने मदत द्यावी : सुनिल पवार


टेम्पो चालक परमेश्वर उर्फ पिंटू धायगुडे यांची घरची परिस्थिती हालाखीची आहे.त्यात पिंटूचा मुत्यू झाल्याने त्याची पत्नीं,दोन मुले,आई-वडील,भाऊ यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.त्याचा कर्ता मुलगा गेल्याने कुंटुबांवर उघड्यावर आले आहे. धायगुडे यांच्या कुंटुबियांना तात्काळ चेन्नई डेअरीकडून मदत द्यावी,अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी दिली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.