Header Ads

इस्लामपूरमध्ये क्रिकेट मैचच्या बेटिंगवर छापा, दोघे ताब्यात

 

 

 

इस्लामपूर : इस्लामपुरमध्ये मुंबई इंडियन दिल्ली कॅपिटल याचे फायनल क्रिकेट मैचच्या बेटिंगवर छापा दोघे ताब्यात घेण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम,अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी आयपीएस मुंबई इंडियन व दिल्ली कँपिटल याचे फायनल क्रिकेट मॅच हार-जीत बर बेटींग खेळणा-या इसमाची माहिती काढुन त्यावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या,दोन पथके नेमण्यात आले होते.पथकाने बुधवार ता.10 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी हे इस्लामपुर विभागात आयपीएल मुंबई इंडियन,दिल्ली कपिटल याचे फायनल क्रिकेट मॅच हार-जीत पर बेटींग घेणा-या व क्रिकेट मैच हार-जीत वर बेटिंग खेळणा-या अशा इसमाची माहिती घेत असताना सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली,इस्लामपुर

मध्ये नितीन ओसवाल रा.कोल्हापुर हा इस्लामपुर येथे इस्लामपुर ते सांगली जाणारे रोडवर चारचाकी आय 10 गाडी नं 4314 या नंबरच्या पांढऱ्या गाडीमधुन कोरवर (बैटिंग) क्रिकेट बेटींगच्या जुगार खेळ घेत होता.गाडी थांबवत गाडीतील दोघांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव  विचारता त्यांनी नितीन सुरेश ओसवाल( वय-43,रा.दुधाई पँव्हेलियन कोल्हापुर), आंनदा गजानन गडकर (वय 35,रा.गवत मंडई, उत्तेरश्वर कोल्हापूर) गाडीची तपासणी केली असता गाडीत स्कोअर कागद, एक पुठ्याचे पँड, सात मोबाईल, चारचाकी असा 3,17,100 रूपयाचा‌ मुद्देमाल मिळून आला आहे सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,अनिल कोळेकर, संदीप गळवे, संदीप नलवडे यांनी ही कारवाई पार पाडली.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.