जत पोलीसाकडून कारवाईचा फार्स,सातत्य गरजेचे
  

जत,प्रतिनिधी : जत शहरातील वाहतूक कोंडी,कोरोनाचे नियम ढाब्यावर बसवून धोका अंगावर घेणाऱ्या नागरिकांवर जत‌ पोलीसांनी कारवाईचा दणका दिला.शहरातील मुख्य चौकात जत पोलीसाकडून नाकाबंदी करत‌ सुमारे 50 नागरिकावर कारवाई करत 10 हजाराचा दंड वसूल केला आहे. मात्र एका दिवसाच्या कारवाईचा फार्स करून परिस्थिती बदलणार नाही.सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी,कोरोना नियमाचे तीनतेरा वाजविले आहे.त्यातच महामार्गाचे काम सुरू असल्याने मुख्य रस्त्यावर काही वाहन धारक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने प्रत्येक दहा मिनीटाला वाहतूक कोंडी होत आहे.पोलीसांनी दिवाळी काळात अतिरिक्त पोलीस नेमून महामार्ग,मुख्य चौकातील वाहतूक कोंडी,गर्दीवर नियंत्रण आणावे,अशी मागणी होत आहे.

 

 

 


 

सीसीटिव्हीची गरज अधोरेखित

 

जत शहरात वर्षभरापुर्वी बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हीमुळे चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते.मात्र सध्या शहरातील सीसीटिव्ही बंद पडल्याने मोबाइल, पैसे,किंमती वस्तू चोरीचे प्रकार सातत्याने होत आहेत.त्यामुळे सीसीटिव्ही यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.