Header Ads

शरद पवार आणि राजू शेट्टींच्या हातमिळवणीचा शेतकऱ्यांना फटका

 

 

 

 

सांगली : शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे ऊसाची झोनबंदी आणि कापसाच्या प्रांतबंदीचा कायदा संपुष्टात आल्यानंतर शरद जोशींनी ऊसदर आंदोलनाच्या सरसेनापतीपदी रघुनाथ पाटील यांची निवड केली.सन 2001 ते 2004 सलग चार वर्ष शेतकरी संघटनेने सांगितलेला ऊसाचा कायदेशीर दर (एसएमपी) साखर सम्राटांना द्यावा लागला. रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी संघटनेच्या ऊसदर आंदोलना नंतर प्रत्येकवेळी शासनाला आदेश काढावा लागला.

 

 

 

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या प्रभावामुळे सन 2002 साली कोल्हापूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिरोळ गटातून साखर सम्राटांचा पराभव करुन राजू शेट्टीं निवडून आले.सन 2004 च्या विधानसभा निवडणुकांची संधी साधून साखर आणि दुध सम्राटांचे नेते शरद पवार,स्व.विलासराव देशमुख आणि स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी संघटनेच्या फुटीचे षडयंञ रचले.राजू शेट्टींना स्वाभिमानी शेतकरी संघटना कांढायला साखर,दुध सम्राटांनी सर्वतोपरी मदत केली.शिरोळ विधानसभा मतदार संघाचे कॉग्रेसचे आमदार सा.रे.पाटील यांची उमेदवारी विलासराव देशमुख यांनी कापली.

 

 

 

शरद पवार आणि गोपीनाथराव मुंडे यांनी राजू शेट्टींच्या उमेदवारीचे समर्थन केले. कॉग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक, तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक आणि दै.पुढारीचे मालक प्रतापसिंह जाधव यांनी राजू शेट्टींना आमदार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.आताही शरद पवार आणि राजू शेट्टींच्या हातमिळवणीचा शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचा आरोप,रघूनाथ‌ पाटील यांनी केला आहे.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.