जत,प्रतिनिधी : काम सरो आणि वैद्य मरो ही आजपर्यत जिल्हा भाजपची निवडणूक रणनिती असली तरी जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे याला जिल्ह्यात अपवाद आहेत. विलासराव जगताप यांनी आजपर्यत अशी रणनिती कधी आखली नाही त्यांनी कायम मित्र पक्षाला सोबत घेतले पण जिल्ह्यात ही परिस्थिती दिसत नसल्याचा टोला लगावत जगताप यांच्या पाठीशी आम्ही मित्र पक्ष म्हणून खंबीर उभा राहून भाजपसोबत मित्र पक्षाचा धर्म निभावणार यात शंका नाही. रासप स्वाभिमानी आहे व राहणार आहे. तेव्हा भाजपने मित्र पक्षाचा धर्म निभावावा असे आवाहन रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले.
भाजपने निवडणुकीत मित्र पक्षाचा धर्म निभावावा | अजितकुमार पाटील यांनी भाजप पक्ष श्रेष्ठीवर डागली तोफ