Header Ads

सनमडीच्या धायगुडे कुटूंबियांना रासपकडून मदतीचा हात

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सनमडी येथील धायगुडे कुटूंबियांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धान्य व जीवनावश्यक किट देवून मदतीचा हात देण्यात आला. रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांच्या हस्ते मदत देण्यात आली.जत पूर्व भागातील बोर नदी पात्रात जत तालुक्यातील सनमडी येथील 32 वर्षीय तरुण परमेश्वर उर्फ गावकऱ्यांचा लाडका पिंटू धायगुडे हा ट्रॅक्टरमध्ये बसून दुधाचे कॅड घेवून जात असताना ट्रॅक्टर करजगी- भिवर्गी पुलावर पलटी झाला.15 ऑक्टोबर झालेल्या या दुर्घटनेत पुरात वाहून गेलेल्या पिंटूचा मृतदेह तिसऱ्या दिवशी मिळाला होता. या घटनेने धायगुडे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी धायगुडे कुटूंबियांची भेट घेत त्यांना जिवनावश्यक किटचे वाटप केले. परमेश्वर उर्फ पिंटू धायगुडे याचे वडील भीमराव, आई सखुबाई यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.


यावेळी रासपचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, बासूभाई मणेर, ज्योतिराम सावंत, मेजर सचिन सरगर, अनिल थोरात, रासपचे युवा आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अमोल कुलाळ, भाऊसो खरात आदी उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.