Header Ads

भारतीय संविधान भारतीयांचा सर्व समावेशक पवित्र ग्रंथ : राहूल गावडे

सोन्याळ,वार्ताहर : 26 नोव्हेंबर संविधान दिन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कार्यालय जिल्हा परिषद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस सहाय्यक आयुक्त,अर्जुन बने, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किरण पराग व महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आले. यावेळी यांनी भारतीय संविधानाचे उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे म्हणाले की, संविधानामुळे सर्व भारतीयांचे हक्क अबाधित राहिले आहेत. जगातील अनेक देशात आपल्या संविधानाचा आधार घेतला जातो. असे सर्व समावेशक संविधान आपल्या घटनाकारांनी निर्माण केले आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.