Header Ads

रिपाईचे सांगली जिल्हा सरचिटणीस डॉ.रवीकुमार गवई यांचा सत्कार


मिरज : डॉ.रवीकुमार गवई यांची रिपाईच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी झालेली निवड ही योग्य असून मिळालेल्या संधीचे ते निश्चितपणे सोने करून सांगली जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करून पक्षाला गतवैभव मिळवून देतील,असा विश्वास रिपाईचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सांगली जिल्हा सरचिटणीसपदी निवड आणि वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. रविकुमार गवई यांचा पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या हस्ते आणि रिपाई युवक आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत सत्कार पार पडला. 


पक्षाच्या मिरज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात डॉ. रविकुमार गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अण्णा जाधव,भटक्या विमुक्त जाती जमातीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश जाधव,सांगली लोकसभा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, युवक नेते श्वेतप्रज्ञ कांबळे, माहिती-तंत्रज्ञान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेन्द्र कांबळे, महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्ष छायाताई सर्वदे, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष पोपट कांबळे, विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सवाखंडे, 
आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, युवक आघाडीचे मिरज तालुका अध्यक्ष नंदकुमार कांबळे, मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, महिला आघाडी मिरज तालुका अध्यक्ष सौ मंगलाताई बनसोडे, आकाश कांबळे, हरीश कोलप, पृथ्वीराज रांजणे, अक्षय कांबळे, राम कांबळे, पिंटू कांबळे, संतोष कांबळे, रतन बनसोडे, अविनाश साठे, प्रवीण कांबळे, प्रमोद वायदंडे, दिलीप माळी, राजू लोखंडे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन कांबळे, युवक आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश चव्हाण, मिरज तालुका उपाध्यक्ष संतोष सरवदे, प्रथमेश कुरणे, युवक आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष संदीप दरबारे आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी डॉ.रवीकुमार गवई यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी डॉ.रविकुमार गवई यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Blogger द्वारे प्रायोजित.